शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आला, चक्कर येऊन उलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:43 IST

दाेन वर्षांपूर्वीच झाला हाेता विवाह

चिपळूण (जि. रत्नागिरी): क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आल्यावर चक्कर येऊन उलटी हाेऊन ओमळी (ता. चिपळूण) येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. दिनेश दिलीप यादव (३०) असे या तरुणाचे नाव आहे. ताे मुंबई बीएसटीमध्ये वाहक म्हणून नोकरी करत होता. सुट्टीत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ताे ओमळी गावी आला हाेता.चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील क्रिकेटपटू दिनेश यादव नारदखेरकी-जाधववाडी (ता. चिपळूण) येथे रविवारी दुपारी २:३० क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेटचा सामना खेळून मैदानातून बाहेर पडत असतानाच त्याला अचानक चक्कर आली आणि उलटी झाली. त्यामुळे त्याला तत्काळ खासगी डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला तपासून पुढील उपचाराकरिता घेऊन जाण्यास सांगितले.त्यानंतर, गणेशखिंडमार्गे येत असताना, रस्त्यातच असणाऱ्या दुसऱ्या खासगी डाॅक्टरांकडे त्याला नेण्यात आले. तिथे त्याला पुन्हा चक्कर आली. त्यानंतर, कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याचा ईसीजी काढून तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत चिपळूण पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

दाेन वर्षांपूर्वीच विवाहदिनेश यादव याचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला हाेता. त्याला एक वर्षाचा छाेटा मुलगाही आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. ताे मुंबई बीएसटीमध्ये वाहक म्हणून नोकरी करत होता. सुट्टीत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ताे ओमळी गावी आला हाेता. मात्र, त्याची गावाकडची ही भेट शेवटची ठरली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणDeathमृत्यू