शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा

By admin | Updated: September 22, 2014 00:50 IST

जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर आणि उपाध्यक्षपदी सतीश शेवडे यांची बिनविरोध निवड झाली़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजपा युतीचा भगवा फडकल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोश केला़विधानसभेच्या जागा वाटपावरुन शिवसेना - भाजपामध्ये युती होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी जिल्ह्यात मात्र आजच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये युती अभेद्य असल्याचा संदेश दोन्ही पक्षांकडून देण्यात आला़ अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना - भाजपा युतीच्या जिल्हाप्रमुख, आमदार व पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष राजेश मुकादम यांच्या दालनात बैठक झाली़ अध्यक्षपदासाठी युतीकडून शिवसेनेचे राजापकर, काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण आणि उपाध्यक्षपदासाठी युतीकडून भाजपाचे सतीश शेवडे व काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे बाळकृष्ण जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ निवडणूक निर्णय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी शिवाजी सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करुन घेतले़ राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण, बाळकृष्ण जाधव यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली़ त्यामुळे शिवसेनेचे राजापकर आणि भाजपाचे शेवडे हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.यावेळी आमदार राजन साळवी, आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार बाळ माने, गणपत कदम, सुभाष बने, राष्ट्रवादीचे संजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, मावळत्या अध्यक्ष मनीषा जाधव उपस्थित होते. (शहर वार्ताहर)निवड जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजापकर व उपाध्यक्ष शेवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. हा सभागृहात चर्चेचा विषय बनला होता.अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. मात्र, सर्व सभापतीपदे युतीकडे होती. मात्र, अध्यक्षपद काँग्रेस आघाडीकडे होते. आजच्या निवडणुकीने अध्यक्षपद शिवसेनेकडे आल्याने जिल्हा परिषदेवर आता निर्विवादपणे युतीची सत्ता आली आहे. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीश राजापकर हे शिरवली गावचे सुपुत्र असून, भांबेड (ता. लांजा) जिल्हा परिषद गटातून, तर उपाध्यक्ष सतीश शेवडे हे कोतवडे (ता. रत्नागिरी) जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्ही शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती आहेत.