शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

१५ तासांनंतर बिबट्याची विहिरीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:00 PM

पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्या ला तब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांनी या बिबट्याला विहिरीतून मुक्त केले.शनिवारी शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांचा पंप अचानक बंद पडल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. ...

पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांनी या बिबट्याला विहिरीतून मुक्त केले.शनिवारी शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांचा पंप अचानक बंद पडल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनविभागाला याबाबतची खबर देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन दाखल झाले. त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु, विहिरीत असलेले पाणी व त्यातच तेथे असलेली मोकळी जागा यामुळे बिबट्या वारंवार त्या जागेचा आधार घेत असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडथळे येत होते. विहिरीचे पाणी काढून बिबट्याला पिंजºयात आणण्याचा प्रयत्नही सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पिंजºयात श्वान ठेवून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. मात्र, त्यालाही बिबट्याने जुमानले नाही.बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग सर्व बाजूंनी प्रयत्न करीत होते. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. या पिंजºयात बिबट्या अलगद येऊन बसला. त्यानंतर ११.३० वाजता त्याला बाहेर काढण्यात यश आले. हा बिबट्या १५ तास झाल्याने भुकेलेला होता. त्याला पिंजºयासकट बाहेर काढल्यानंतर जमलेल्या गर्दीच्या दिशेने तो झेप घेण्याचा प्रयत्न करीत होता.हा बिबट्या सुमारे १० वर्षे वयाचा असून, नर जातीचा असल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले. 

टॅग्स :forest departmentवनविभाग