ॲड. नयन वाडकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:32+5:302021-04-17T04:30:32+5:30

चिपळूण : सहकार, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपल्या कार्याने सर्वांना परिचित असणारे विद्वान वकील ...

Adv. Death of Nayan Wadkar | ॲड. नयन वाडकर यांचे निधन

ॲड. नयन वाडकर यांचे निधन

चिपळूण : सहकार, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपल्या कार्याने सर्वांना परिचित असणारे विद्वान वकील नयन वाडकर (७२) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

चिपळुणातील आज उदयास आलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. चिपळूण वैश्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या उभारणीपासून ते आजपर्यंत अण्णांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार क्षेत्रामध्ये मानले जाते. या पतसंस्थेच्या उभारणीपासून पहिली ४ वर्ष उपाध्यक्ष म्हणून व त्यानंतर सलग २५ वर्ष याच पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच मुरलीधर देवस्थानचे ते गेले अनेक वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्यावर कऱ्हाड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Adv. Death of Nayan Wadkar