नाखरे येथे विहिरीमध्ये पडून प्रौढाचा मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: September 9, 2022 19:25 IST2022-09-09T19:24:26+5:302022-09-09T19:25:04+5:30

दोन दिवसांपूर्वी ते जवळच असणाऱ्या बागेत गेले होते. 

adult dies after falling into well at nakhare ratnagiri | नाखरे येथे विहिरीमध्ये पडून प्रौढाचा मृत्यू

नाखरे येथे विहिरीमध्ये पडून प्रौढाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे धनगरवाडी येथील शांताराम भागोजी कोकरे (५५) यांचा जवळच असलेल्या विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ते जवळच असणाऱ्या बागेत गेले होते. 

८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. शांताराम भागोजी कोकरे हे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पद्माकर नारायण कोकरे यांच्या बागेत गेले होते. विहिरीमध्ये पडल्यानंतर त्यांचा मृतदेह ८ रोजी सकाळी ९ वाजता पाण्यामध्ये तरंगत असल्याचे लक्षात आले. 

याबाबत गोविंद विठ्ठल कोकरे यांनी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ही व्यक्ती मृत झाल्याचे लक्षात येताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला. शांताराम भागोजी कोकरे हे विहिरीत कसे पडले, याचा तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: adult dies after falling into well at nakhare ratnagiri