दत्तकपुत्र भाजपला बुडवतील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राणेंना टोला

By संदीप बांद्रे | Published: February 17, 2024 05:21 PM2024-02-17T17:21:59+5:302024-02-17T17:22:36+5:30

चिपळूण : भाजपमध्ये बाहेरून आलेले दत्तकपुत्रच पक्ष चालवत आहेत. एक दिवस हेच दत्तकपुत्र भाजपला बुडवतील. भाजपची त्या दृष्टीने वाटचाल ...

Adopted son will sink BJP, Thackeray group district chief Sachin Kadam told Rane | दत्तकपुत्र भाजपला बुडवतील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राणेंना टोला

दत्तकपुत्र भाजपला बुडवतील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राणेंना टोला

चिपळूण : भाजपमध्ये बाहेरून आलेले दत्तकपुत्रच पक्ष चालवत आहेत. एक दिवस हेच दत्तकपुत्र भाजपला बुडवतील. भाजपची त्या दृष्टीने वाटचाल सुरू असून राणे यांच्या कृतीतून ते प्रकर्षाने जाणवले. टायगर इज कमिंग असे म्हटले जात होते. परंतू टायगर मैदान सोडून आधीच पळून गेला, लोकसभेला निवडणुकीतून देखील त्यांनी पळ काढलाच आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. तसेच अंत्यत खालच्या पातळवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर पोलिसांनी कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. 

माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्रकार परिषद घेऊन निलेश राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध केला. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले, टायगर इज कमिंग ची केलेली बॅनरबाजी ही राड्याचे द्योतक होते. आमदार जाधवांन उत्तर देण्यासाठी अथवा राडा करण्यासाठी सभा घेतली, हे यातून स्पष्ट झाले आहे. सुरवातीपासून राणे हे उद्धव ठाकरे व पक्षाच्या नेत्यांवर अर्वाच्च शिवराळ भाषेत बोलत होते. त्याचेच उत्तर जाधव यांनी कणकवली येथे दिले. राजकारणात या गोष्टी चालत असतात. परंतू कायदा हातात घेणे अत्यंत चुकीचे आहे. राणेंच्या कृतीतून लोकशाही धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अशा गोष्टीला भाजप खतपाणी घालणार असेल तर ते दुर्देव आहे. 

गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात घाणेरडी भाषणे कोणाची झालेली नाही किंवा एैकलेली नाहीत. आगामी कालावधीत निवडणूका होणार आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था धाब्यावरबसवून वाटेल तसे भाजपनेते वक्तव्य करीत सुटले आहेत. राणेंकडून जिल्ह्यात शांतता भंग करण्याचे काम सुरू असून ते भाजपकडून जाणीवपुर्वक घडवले जात आहे. त्यास पोलिसांनी वेळीच आळा घालावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काळात मोठ्या घटना घडतील, पोलिसांनी वेळीच खबरदारी बाळगून राणेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संतोष पवार उपस्थित होते.

Web Title: Adopted son will sink BJP, Thackeray group district chief Sachin Kadam told Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.