दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:33+5:302021-08-21T04:36:33+5:30
रत्नागिरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस ...

दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश
रत्नागिरी : महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्याचा विचार सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
शिवसेनेतर्फे रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघ तरुणांच्या लसीकरणाच्या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी हातखंबा येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या परिवारातील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
हातखंबा व पाली येथे शिवसेनेने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी साईनाथ दुर्गे, नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबू म्हाप, परशुराम कदम, संजना माने, कांचन नागवेकर, तुषार साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.