शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 1:47 PM

Trafic Ratnagiri-रत्नागिरी शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.

ठळक मुद्देवाहने रस्त्यावर लावण्याचे प्रकार वाढलेशहर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा

रत्नागिरी : शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही चालक अजूनही रस्त्यावरच गाड्या लावून इतरत्र जात आहेत.सध्या प्रत्येक घरात किमान एक दुचाकी असे प्रमाण झाले आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र दुचाकी वापरते. याचबरोबर आता मध्यमवर्गीय सर्रास चारचाकीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत.

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारूती मंदिर, माळ नाका, राम आळी, गोखले नाका, धनजी नाका या भागात अनेक दुकानांसमोर नो पार्किंगचे फलक समोर लावलेले असतानाही नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या रस्त्यावरच लावून इतरत्र जातात. त्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असून, यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो.शहरात अनेक भागात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकासमोर किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी गाडी लावल्यास शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा वाहनचालकांकडून २०० रूपयांच्या दंडाची वसुली केली जाते. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मारूती मंदिर येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने सुसज्ज अशी चारचाकी आणि दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने वाहतुकीला शिस्त लागत आहे.गोखले नाका, धनजी नाका सर्वात त्रासदायकशहरातील गोखले नाका, धनजी नाका या भागात सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. बरेचदा सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एकाच पोलिसाला नियंत्रण करावे लागते. दुपारच्या वेळेत पोलीस नसल्याने मात्र राम आळी, गोखले नाका, धनजी नाका येथे दुचाकींबरोबरच मोठी वाहनेही वाट्टेल तिथे थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.कारवाईला प्रारंभचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. नो पार्किंगचा फलक समोर दिसत असूनही त्याच्यासमोरच गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच काही वेळा अपघात घडतात. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. गेल्यावर्षी १४,६४६ जणांकडून २९ लाख २८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी