खेडमध्ये ८ दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:35+5:302021-06-01T04:23:35+5:30
खेड : शहरातील आठ दुकानदारांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. खेडमध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ...

खेडमध्ये ८ दुकानदारांवर कारवाई
खेड : शहरातील आठ दुकानदारांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.
खेडमध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये राजेश सखाराम कोळणकर (५७, रा.महाड नाका) यांचे तीनबत्ती नाका येथील सनी स्पेअर पार्ट, राजन भिकू चव्हाण (६०, रा.कोडीवली) यांचे तीनबत्ती नाका येथील राजन इलेक्ट्रिकल, अब्दुल रहेमन कौचाली (५५, रा.तीनबत्ती नाका) यांचे भारत ट्रेडिंग, कौचाली पटेल मोहल्ला, बासित हुसेनमियाँ ढेणेकर (३०, रा.पटेल मोहल्ला) याचे खेड तीनबत्ती नाका येथील शीतल फुटवेअर, अमीर अख्तर महाडिक (३२, रा.बाजारपेठ) यांचे खेड बाजापेठ जनरेशन मेन्स वेअर, रियाज इब्राहिम देसाई (५५, रा.खेड) यांची गौसिया बेकरी बाजारपेठ, संकेत प्रमोद बुटाला (३७, रा.बाजारपेठ) यांचे हरिश्चंद्र बुटाला ब्रदर्स, इर्शाद अली चौगुले (४१, रा.बाजारपेठ) यांचे स्टार फॅशन, विश्वास शिवाजी मुधोळे (५४, रा.बाजारपेठ) यांचे शिवाजी पान जनरल स्टोअर आदीं दुकानदारांचा समावेश आहे.