विनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई, 6 लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 06:28 PM2021-06-06T18:28:37+5:302021-06-06T18:31:58+5:30

CoronaVirus In Ratnagiri :  कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Action taken against 1732 vehicles for no reason, fine of Rs 6 lakh recovered | विनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई, 6 लाखांचा दंड वसूल

विनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई, 6 लाखांचा दंड वसूल

googlenewsNext
ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्या 1732 वाहनांवर कारवाई6 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी  कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 3 जूनपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. 3 जून रोजी 801 वाहनांवर कारवाई करत 2 लाख 87 हजार 700 रूपयांचा दंड वसूल केला. 9 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

4 जून रोजी 501 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 68 हजार 600 रुपये दंड वसूल केला. 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी 5 जून रोजी 430 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 49 हजार रूपयांचा दंड वसूल केला असून सहा वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

Web Title: Action taken against 1732 vehicles for no reason, fine of Rs 6 lakh recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.