मास्क न लावल्याने प्राैढावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST2021-05-28T04:24:06+5:302021-05-28T04:24:06+5:30

रत्नागिरी : तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या प्राैढावर पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Action on Praidha for not wearing mask | मास्क न लावल्याने प्राैढावर कारवाई

मास्क न लावल्याने प्राैढावर कारवाई

रत्नागिरी : तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या प्राैढावर पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पावस बाजारपेठेत २२ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता करण्यात आली.

केतन किशोर वामनसे (५०, रा. नालेवठार पावस रत्नागिरी) असे कारवाई करण्यात आलेल्या प्राैढाचे नाव आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग हाेऊन दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही तोंडाला मास्क न लावता फिरत हाेते. याठिकाणी तैनात असलेल्या पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. अधिक तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक जण अजूनही मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

Web Title: Action on Praidha for not wearing mask