मास्क न वापरणाऱ्या दाेघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:35+5:302021-04-10T04:30:35+5:30
रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, मास्कसह अन्य खबरदारीचे उपाय न करणाऱ्यांवर कारवाई केली जात ...

मास्क न वापरणाऱ्या दाेघांवर कारवाई
रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधात्मक
कारवाईसाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, मास्कसह अन्य खबरदारीचे उपाय न
करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जयगड आणि हातखंबा येथे पोलिसांनी कारवाई
करत दाेघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे
कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे माहीत असतानाही तोंडाला व नाकाला
मास्क न लावणाऱ्या प्रौढाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अरुण केशव पाडावे (५३, रा. झरेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा
दाखल केलेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला
ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबई - गोवा महामार्गावर गेले होते. त्यावेळी त्यांना
हातखंबा तिठा येथे अरुण पाडावे तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी
फिरताना दिसले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल झगडे करत
आहेत.
तर जयगड येथे चाफेरी गवळीवाडीतील हॉटेल गुरुकृपा
येथे येणाऱ्या ग्राहकांना मास्क न वापरता खाद्यपदार्थ देणाऱ्या अनिल सोनू
केदारी (५१, रा. चाफेरी, गवळीवाडी) याच्यावर जयगड पोलिसांकडून
कारवाई करण्यात आली आहे.