मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

By अरुण आडिवरेकर | Published: December 19, 2022 11:18 AM2022-12-19T11:18:51+5:302022-12-19T11:19:23+5:30

उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला दिली धडक, अन्..

accident at Hatkhamba on Mumbai Goa highway, two trucks burnt down | मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

Next

रत्नागिरी : उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली आणि अपघातानंतर दोन्ही ट्रकनी पेट घेतला. दोन्ही ट्रकमधील चालकांना गावातील तरुणांनी जीवाची बाजी लावत वाचवले. मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे दोन ट्रकचा आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

दोन्ही ट्रकमधून साखरेची वाहतूक करण्यात येत होती. महामार्गावरील हातखंबा गावात उतारून येणाऱ्या ट्रकने आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर पुढील ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या टायरने पेट घेतला आणि दोन्ही ट्रक एकाचवेळी पेटले. 

गावातील मुन्ना देसाई मित्रमंडळाच्या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तत्काळ नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. तर आगीवर नियंत्रण मिळावे यासाठी स्थानिक विहिरीतून पाणी पुरवठा घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. दोन्ही ट्रकमधील चालकांना वाचवण्यात यश आले असले तरी आगीत ट्रक आणि आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Web Title: accident at Hatkhamba on Mumbai Goa highway, two trucks burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.