शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

होय! ‘ती’ बेपत्ता तरुणी माझी सुखप्रीत आहे!, हरयाणाहून आलेल्या पित्याला अश्रू झाले अनावर; शोध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:43 IST

रत्नागिरीतील तरुणाकडून सुखप्रीतचा मानसिक छळ?

रत्नागिरी : येथील भगवती किल्ल्यानजीक डोंगरावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. दरम्यान, ती नाशिकहून आलेली हरयाणाची तरुणी असल्याच्या मुद्द्यावर बहुतांश शिक्कामोर्तब झाले आहे. घटनास्थळी आढळलेली चप्पल आणि ओढणी आपल्या मुलीची म्हणजे सुखप्रीतची असल्याचे, तिच्या शोधासाठी हरयाणाहून आलेल्या प्रकाशसिंह धारिवाल यांनी पोलिसांना सांगितले आहे.रविवारी (दि. २९) दुपारी एक तरुणी भगवती किल्ल्यानजीकच्या पाणभुयार स्पॉटच्या डोंगरावरून २०० ते २५० फूट खाली समुद्रात पडली. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात कोठेही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार न आल्याने पोलिसांसमोर गूढ निर्माण झाले होते.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील पोलिस स्थानकात आयडीबीआय बँकेत काम करणारी तरुणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार देण्यात आली हाेती. ही मुलगी हरयाणाची असून, तिचे वडील नाशिकमध्ये आले होते.हा एक धागा मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये बोलावण्यात आले. गुरुवारी सकाळी ते रत्नागिरीत आले. पोलिसांनी त्यांना घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ओढणी दाखवली. या वस्तू आपली मुलगी सुखप्रीतच्या असल्याचे त्यांनी ओळखले. आपल्या मुलीने भावनिक फसवणूक किंवा मानसिक छळातून टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.रत्नागिरीतील तरुणाकडून सुखप्रीतचा मानसिक छळ?सुखप्रीतला रत्नागिरीतील बँकेत काम करणारा तरुण मानसिक त्रास देत होता. हा तरुण तिच्याशी प्रेमाचे नाटक करत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असावे, असा संशयही प्रकाशसिंह धारिवाल यांनी व्यक्त केला आहे.