शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

Ratnagiri: पोहताना गंटागळ्या खाल्या, तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:58 IST

मित्रांसोबत गेला होता पोहायला

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर-तळे येथे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार २ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदेश दत्ताराम घडशी ( १७, रा. देवरुख- ता. संगमेश्वर) असे या तरुणाचे नाव आहे.आदेश सोमवारी आपल्या मित्रांसोबत रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर तळे या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता. दुपारी तीनच्या सुमारास आदेश तळ्यामध्ये पोहण्यास उतरला. पोहताना अचानक तो पाण्यात गंटागळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आसपासचे लोक धावून आले आणि त्यांनी आदेशला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तोपर्यत आदेश पाण्याच्या तळाशी जाऊन पोहचला होता.सोमेश्वरच्या स्थानिक तरुणांनी आदेशला पाण्यातून बाहेर काढले आणि बेशुद्धावस्थेतच त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत आदेशची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू