शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खेड न्यायालयाच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती गंभीर

By मनोज मुळ्ये | Updated: September 1, 2022 19:17 IST

हर्षल शिरोडकर खेड : येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, ...

हर्षल शिरोडकरखेड : येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास खेडमध्ये घडली. छाया सावंत (४५, बौद्धवाडी, वेरळ, ता. खेड) असे या महिलेचे नाव आहे. कोर्टातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी हा प्रकार का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार एक सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास खेड न्यायालयाच्या आवारातील मंदिराशेजारी छाया सावंत यांनी औषधी गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या बेशुद्ध पडल्या. त्यांनी कसल्या गोळ्या खाल्ल्या, ते समजू शकलेले नाही.या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायालयीन कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तेथे त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.या महिलेने हा प्रकार का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात उशिरापर्यंत कसल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस