शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधील कुटुंबाच्या गाडीला राजापुरात अपघात, महिलेचा मृत्यू

By मनोज मुळ्ये | Updated: April 5, 2024 19:05 IST

राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे ...

राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे आज, शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात राजरानी चौरसिया (वय-६८) या महिलेचा मृत्यू झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला.उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशहून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून ते गोव्याला फिरण्यासाठी निघाले हाेते. शक्ती राजाराम चाैरसिया (२६, रा. पुणे) हे चारचाकी गाडी (युपी ५३, डीएम ८०९०) घेऊन पुण्यावरून ओणी-विटा महामार्गाने अणुस्कुरा-पाचल-ओणी असा प्रवास करत होते. या गाडीतून पाचजण प्रवास करत हाेते. ही गाडी शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे येथे आली असता शक्ती चाैरसिया यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जुनाट झाडावर आदळली.

ही धडक एवढी जबरदस्त हाेती की, राजरानी चौरसिया यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच राजरानी चाैरसिया यांचा माेठा मुलगा चालक शक्ती चौरासिया, संजयकुमार चौरासिया (४७), सरिता संजय कुमार चौरासिया (४२) आणि चार वर्षाची लहान मुलगी किमाया चौरासिया किरकाेळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती रायपाटण पोलिस स्थानकाचे पाेलिस काॅन्स्टेबल नीलेश कात्रे, स्वप्निल घाडगे, भीम कोळी तसेच राजापूर दक्षता कमिटीच्या धनश्री मोरे यांना कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पाेहाेचून मदत केली. मृत महिलेचा मृतदेह रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला हाेता. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली. पुढील तपास राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश