शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्च, तरी तहान भागेना; रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही टँकरमुक्ती दूरच, किती कोटी खर्च केले.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:48 IST

रहिम दलाल रत्नागिरी : दरवर्षी मुबलक पाऊस पडतो आणि तरीही दरवर्षी उन्हाळ्यासोबत हातात हात घालून पाणीटंचाईही जिल्ह्यात दाखल होते. ...

रहिम दलालरत्नागिरी : दरवर्षी मुबलक पाऊस पडतो आणि तरीही दरवर्षी उन्हाळ्यासोबत हातात हात घालून पाणीटंचाईही जिल्ह्यात दाखल होते. गेल्या पाच वर्षांत ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध योजनांवर तब्बल २३ कोटी ७८ लाख ७८ हजार ३५४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे साडेतीन कोटी रुपये केवळ टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च झाले आहेत.

मात्र, दरवर्षी पाणीटंचाईवर तसेच विविध पाणीपुरवठ्याच्या योजना राबवूनही टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या काही कमी झालेली नाही. टंचाईवर पाण्यासारखा खर्च करूनही तहान भागेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजेच समाधानकारक पडतो; परंतु पावसाचे पाणी अडविण्यासाठी पर्याय म्हणून ऑक्टोबर महिन्यापासून श्रमदानातून बंधारे बांधण्यात येतात. पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने बहुतांश पाणी वाहून जाते; तसेच धरणे भरल्यानंतरही पाणी सोडून द्यावे लागते. परिणामी, दरवर्षीच पाणीटंचाई उद्भवते व ती निवारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तजवीज करावी लागते. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून त्यामध्ये उपाययोजना करण्यात येतात.

टंचाई निवारण्यासाठी मागील ५ वर्षांचे खर्चाचे आकडे पाहता प्रत्येक वर्षी पाण्यावर पाण्यासारखा खर्च करूनही पाणीटंचाई संपलेली नाही. पावसाचे प्रमाण अधिक असले तरी जमीन सच्छिद्र असल्याने पावसाचे पाणी वाहत जाऊन ते नदी, नाले, समुद्राला मिळते. जमिनीखालून वाहून जाणारे हे पाणी अडवण्याच्या दीर्घकालीन योजना राबवणे, हाच त्यावरील उपाय ठरू शकतो.मागील पाच वर्षांतील खर्चवर्ष  - खर्च

  • २०१९-२० - ७,८५,०४,४५०
  • २०२०-२१ - ४८,९४,८८६
  • २०२१-२२ - ६,८८,४६,१७३
  • २०२२-२३ - ५,१६,९९,४९५
  • २०२३-२४ - ३,३९,३३,३५०

गतवर्षीचे टंचाईचे २.८५ कोटी येणेगतवर्षी सन २०२३-२४ च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यासाठी नवीन विंधनविहीर खोदाई, विंधनविहीर दुरुस्ती करणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, तसेच टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे हाती घेण्यात आली होती.

टंचाई निवारण करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चापैकी शासनाकडून २ काेटी ८५ लाख ९६ हजार रुपये येणे आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ही येणे असलेल्या रकमेसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, ती रक्कम अजूनही आलेली नसल्याने ठेकेदारांची देणी बाकी आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ