Accident: बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू, चिपळूणातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 02:10 PM2022-05-09T14:10:15+5:302022-05-09T14:11:03+5:30

चिपळूण : आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश प्रभाकर गुरव (वय-४३) असे मृत ...

A two-wheeler from Guhagar taluka died on the spot after being hit by an Eicher vehicle in Chiplun | Accident: बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू, चिपळूणातील घटना

Accident: बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू, चिपळूणातील घटना

Next

चिपळूण : आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश प्रभाकर गुरव (वय-४३) असे मृत तरूणाचे नाव आहे.  चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे आज, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महेश हा वेळंब येथील रहिवासी आहे. 
      
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महेश हा पहाटेच्या सुमारास गुहागरवरून चिपळूण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघाला होता. तो चिपळूण बाजारपेठेत येताच बॅ. नाथ पै चौकात त्याला एका आयशर गाडीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये महेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संबंधीत आयशर चालक गाडीसह तेथून पसार झाला. यावेळी काहींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो हाती लागला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सबंधीत गाडीचा शोध पोलीस घेत आहे. सबंधीत आयशर चालक हा रत्नागिरीहून मुंबईकडे आंब्याची वाहतूक करणारा होता, असा अंदाज पाठलाग करणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: A two-wheeler from Guhagar taluka died on the spot after being hit by an Eicher vehicle in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.