शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडीतील एक बोगदा पुन्हा बंद, गणेशोत्सवासाठी करण्यात आला होता सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 11:42 IST

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा अपूर्ण असलेल्या अंतर्गत कामांसाठी २० ...

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा अपूर्ण असलेल्या अंतर्गत कामांसाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी ५ सप्टेंबरपासून कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी हा बाेगदा सुरू करण्यात आला होता.गतवर्षी गणेशोत्सवात दोनपैकी एका बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली. त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली. तो बोगदा या वर्षी २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी लहान वाहनांसाठी पुन्हा सुरू झाला. आता यावेळेच्या गणेशोत्सवासाठी दुसरा बोगदाही मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड यादरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामांमुळे गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे गौरी - गणपती विसर्जन आटोपून परत जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फारसा फटका बसलेला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली होती. वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते.दीड महिना बंद राहणारसद्य:स्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता एका बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक केली जात आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या बोगद्यातून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बोगद्यातील अपघातांनाही आळा बसलेला आहे. मात्र, अपूर्ण असलेली अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी नुकताच सुरू करण्यात आलेला दुसरा बोगदा २० सप्टेंबरपासून पुढील एक ते दीड महिना बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग