शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्लासच्या फीसाठी लिंकवर क्लिक केले अन् क्षणात ८० हजार रुपये गेले, रत्नागिरीतील खेडशीमधील शिक्षिकेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:10 IST

मोबाईलवर प्रवेश फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. साबळे यांना या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले.

रत्नागिरी : अबॅकस क्लासची ऑनलाइन फी देण्याच्या बहाण्याने शिक्षिकेच्याच खात्यातील सुमारे ८० हजार रुपये लंपास करण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी (९ डिसेंबर) सायंकाळी खेडशी येथे घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात प्रवीण कुमार (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दीप्ती दत्ताराम साबळे (३२, रा. खेडशी - श्रीनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. दीप्ती साबळे या शिक्षिका असून, त्या अबॅकसचे क्लास घेतात. प्रवीण कुमार नावाच्या व्यक्तीने त्यांना शुक्रवारी सायंकाळी फोन करून आपल्या दोन मुलांना अबॅकससाठी प्रवेश घ्यायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फी भरण्यासाठी गुगल पे वरून २ रुपये पाठवून साबळे यांना खात्री करण्यास सांगितले. त्यावर साबळे यांनी पैसे जमा झाल्याचे प्रवीण कुमार याला सांगितले.दीप्ती साबळे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रवीण कुमारने त्यांच्या मोबाईलवर प्रवेश फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. साबळे यांना या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले. साबळे यांनी पासवर्ड टाकल्यानंतर त्यांच्या खात्यातील ७९ हजार २४० रुपये काढून घेण्यात आले. प्रवीण कुमार याने हे पैसे आपल्या खात्यात घेऊन साबळे यांना गंडा घातला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीप्ती साबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात १० डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून प्रवीण कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीonlineऑनलाइन