शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांची लुटारु टोळी; रत्नागिरी, चिपळूण येथे वृद्धांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:18 IST

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

रत्नागिरी : पाेलिस असल्याचे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे दाेन वृद्धांना लुटल्याच्या घटना शनिवारी (२५ फेब्रुवारी) घडल्या. याप्रकरणी रत्नागिरीत तिघांविराेधात तर चिपळुणात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्यांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले असून, दागिने लुटणारी टाेळी पुन्हा जिल्ह्यात कार्यरत झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.रत्नागिरीतील घटनेबाबत गिरीधर दत्तात्रय साखरकर (७३, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी दुपारी १:३० वाजता श्रीदेव भैरी मंदिरातून देवदर्शन करून रस्त्याने चालत जात हाेते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी आपण पाेलिस असल्याचे सांगत सुरक्षिततेसाठी बाेटातील अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना बाेलण्यात गुंतवून कागदाच्या पुडीतील अंगठ्या चाेरून पुडीत दगड ठेवून पाेबारा केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.असाच प्रकार चिपळूण येथे घडला असून, दिवाकर गाेविंद नेने (७५, रा. प्रांत ऑफिससमाेर, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी १० वाजता दूध आणण्यासाठी जात असताना दाेन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ‘ओ काका जरा इकडे या,’ अशी हाक मारून बाेलावून घेतले. दाेघांनी काेराेनाचे कारण सांगून मास्क वगैरे विचारून तुमच्याकडील माेबाईल, घड्याळ, साेन्याचे दागिने रुमालात बांधून ठेवा. पुढे चाेऱ्या हाेत आहे, आम्ही पाेलिस आहाेत, आम्ही सगळ्यांना सांगत आहाेत, असे सांगितले. त्यानंतर नेने यांना गळ्यातील साेन्याची चेन व हातातील अंगठी, माेबाईल व घड्याळ रुमालात गाठी मारून खिशात ठेवण्यास सांगितले. या वस्तू खिशात ठेवून ते दूध आणण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांनी खिशातील रुमालात पाहिले असता दागिने, माेबाईल, घड्याळ नसल्याचे लक्षात आले. आपल्याकडील ऐवज चाेरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. दाेन्ही घटनांमध्ये चाेरीला गेलेल्या ऐवजाचा तपशील पाेलिसांनी दिलेला नाही. त्यामुळे त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी