शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Ratnagiri: प्रेमसंबंध तोडायला सांगितले; रिक्षाचालकाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:08 IST

लांजा : तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ...

लांजा : तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न झालेले असताना अन्य एका महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध घरच्या सर्वांना कळल्याच्या नैराश्येतून त्याने हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.गवाणे येथील विनायक आनंद कांबळे (३८) हा रात्र पाळीमध्ये लांजा येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. लग्न होऊन आठ वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने तो निराश होता. त्याचे लांजा येथे राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती घरच्या मंडळींना मिळाली. मंगळवारी विनायकला घेऊन त्याचे आईवडील व त्याची पत्नी त्या महिलेकडे गेले. ती महिला व विनायकची एकत्र समजूत काढण्यात आली. यापुढे आम्हा दोघांमध्ये कोणताच संबंध राहणार नाही, असे आश्वासन विनायकने दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता.रात्री जेवून सर्व कुटुंब झोपी गेले. सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पत्नी उठली, त्यावेळी विनायक झोपलेला होता. त्यानंतर तीही झोपली. नंतर विनायकने रिक्षाची केबल घेऊन घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. ५:३० वाजता पत्नी उठली असता विनायक आपल्या जागेवर नसल्याने शोधाशोध करण्यात आली. तो आसपास प्रातविरधीसाठी गेला असेल असे सर्वांना वाटले. त्याची आई सकाळी अंगणात आली असता तिला आंब्याच्या झाडाला विनायक लटकत असल्याचे दिसले. तिने आरडाओरडा केल्यानंतर विनायकचे वडील, पत्नी धावत आली.विनायकने आत्महत्या केल्याची खबर वडील आनंद सयाजी कांबळे यांनी लांजा पोलिसांनी दिली आहे. आनंद यांना विवाहित तीन मुली आहेत. विनायक हा एकुलता मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगले अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस