शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार - खासदार नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:42 IST

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर ...

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल आणि त्यासाठी रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उद्योग येतील. एमआयडीसी होणार तसेच येथील मुलांसाठी इंजिनिअरिंगबरोबरच वेगवेगळे ट्रेड आणण्यात येणार आहेत. इथल्या मुलांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी तजवीज करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात विवध प्रकारचे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी आपले प्रयत्न असतील. कृषी उद्योगांना अधिक चालना आपण देऊ. उद्योगासाठी दळणवळण सुविधा गरजेच्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महामार्गाचा ठेकेदार कोण आहे, ते काम किती दिवसांत करणार आहात, याची कालमर्यादा मागणार आहे. २० दिवसांनी आपण याबाबतची बैठक लावणार असल्याचे ते म्हणाले.कोळशापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू न करण्यासाठी ते उद्योजक मातोश्रीवर गेले होते. कारण जैतापूर सुरू झाल्यास कोळशावर चालणारे वीज प्रकल्प बंद होतील. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आर्थिक तडजोड झाली असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आयएएस, आयपीएसमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या वाढावी, यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग सुरू करू, असेही राणे यांनी सांगितले.उद्योगांवर भरयेथील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. स्थानिकांना त्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक तरुणांना येथेच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील तेव्हाच त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. त्यासाठी येथे वेगवेगळे प्रकारचे क्लासेस घेऊन तरुणांना प्रवृत्त करण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे