शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:57 IST

बस जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही 

रत्नागिरी / महाड : प्रवासादरम्यान अचानक टायर फुटून रत्नागिरीतल एका खासगी आरामबसला आग लागली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीनजीक सावित्री पुलानजीक घडला. बराचवेळ आग पेटतच राहिल्याने बसचे खूप नुकसान झाले. बसमधील २३ जण बालंबाल बचावले.रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स ही कंपनी असून, या कंपनीने गौरव चव्हाण यांच्या मालकीची भाडेतत्त्वावर घेतलेली प्रवासी बस (एमएच ०८-ई-९७७९) बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ती मध्यरात्री उशिरा २:३० वाजण्याच्या दरम्यान महाडच्या सावित्री पुलाजवळ आली. अचानक तिच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून त्याने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना झटपट खाली उतरवले.

बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आगीचा जोर जास्त असल्याने संपूर्ण बसने पेट घेतला आणि बघता बघता बस जाळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या बसमध्ये १९ प्रवासी आणि चालकासह ट्रॅव्हल कंपनीचे ४ असे एकूण २३ जण प्रवास करीत होते. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली.दरम्यान या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे उदाहरण समोर असताना आता मुंबई गोवा महामार्गाचेदेखील काँक्रिटीकरण झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीत अशा पद्धतीने टायर फुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग