Ratnagiri: चिपळूणात हॉटेलमधील आचाराकडे सापडली पिस्तुल; ४६ राउंडसह २ फायटर जप्त
By संदीप बांद्रे | Updated: November 8, 2023 18:55 IST2023-11-08T18:54:26+5:302023-11-08T18:55:21+5:30
चिपळूण : येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ...

Ratnagiri: चिपळूणात हॉटेलमधील आचाराकडे सापडली पिस्तुल; ४६ राउंडसह २ फायटर जप्त
चिपळूण : येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
चिपळूण मधील वालोपे परिसरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, बुधवारी दुपारी पोलिस पथकाने थेट वालोपे येथील माऊली अपार्टमेंटवर धडक दिली. पोलिसांनी नीरजच्या रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलीस स्थानकात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती आणि कशासाठी बाळगली होती, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.