शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'कोणतीही चौकशी करू नका', स्टेटस ठेवत रत्नागिरीतील वकिलाने संपवले जीवन

By अरुण आडिवरेकर | Updated: July 23, 2024 16:17 IST

रत्नागिरी : 'माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, ...

रत्नागिरी : 'माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका,' असा स्टेटस ठेवत रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून उडी मारून वकिलाने आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. ॲड. सौरभ सोहनी असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. ॲड. सौरभ सोहनी हे मूळचे राजापुरातील रहिवासी असून, ते रत्नागिरीत वकिली करीत होते. आपल्या मित्रासोबत ते भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो, असे सांगून ते खोलीमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट भाट्ये पूल गाठला. भाट्ये पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वकील आणि पोलिस त्यांच्या शोधात बाहेर पडले. मात्र, रात्रीची वेळ आणि त्यातच मुसळधार पाऊस यामुळे त्यांच्या शोधकार्यात अडचणी आल्या. मंगळवारी सकाळी ॲड. सौरभ सोहनी यांचा मृतदेह रत्नागिरी शहरातील खडपेवठार समुद्रकिनारी तरंगताना आढळला. याची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस