शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:35 IST

युतीसाठी उद्धवसेनेची धडपड

रत्नागिरी : शेतकरी कर्जमाफी करत असताना त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. कुणाला कर्जमाफी द्यायची हे समितीचा अहवाल ठरवेल, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केली.रत्नागिरीच्या दाैऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांना शेतकरी कर्जमाफीबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, बाकीचे मंत्री काय बाेलले यापेक्षा मी शासनाच्या वतीने जे पत्र दिले आहे ते महत्त्वाचे आहे. शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर ताे निर्णय घेतला जाईल. ती समिती कशासाठी महत्त्वाची आहे, तर कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपण कर्जमाफी देणार आहाेत का?, छाेट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किती देणार आहाेत?, पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती लाभ देणार आहाेत?, या सगळ्याचा उल्लेख त्या समितीकडे असेल. समिती शासनाकडे अहवाल देईल आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार आहाेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

महायुतीवर बोलण्याचा मंत्र्यांना अधिकार नाहीमाझ्यासकट कोणत्याही मंत्र्याला महायुतीवर बाेलण्याचा अधिकार नाही. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावर बाेलू शकतात. भरत गाेगावले यांना माहिती कुठून मिळाली हे मला माहीत नाही. याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांना ही माहिती कुठून मिळाली याचा अहवाल घेईन, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

युतीसाठी उद्धवसेनेची धडपडमनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे, राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या राज ठाकरे मान्य करतील, असे मला वाटत नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे. एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्यासाेबत युती करावी, यासाठी किती धडपड करताे हे उद्धवसेनेने जगाला दाखवून दिले आहे.