शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गॅस गळती होऊन कंपनीत स्फोट; हातखंब्यातील तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:05 IST

रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील महेश गोविंद घवाळी (३७) ...

रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील महेश गोविंद घवाळी (३७) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी या तरुणाचा मृतदेह रत्नागिरीत आणला असून, रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या तरुणाचा गॅस गळती होऊन गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. रत्नागिरी एमआयडीसीतील एका कंपनीचा एक प्लँट ओडिशाला काही वर्षांपूर्वी शिफ्ट झाला होता. रत्नागिरीत प्लँटमध्ये काम करणारे अनेक कामगार ओडिशाला गेले होते. त्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती रत्नागिरीत धडकली. या माहितीनंतर कामगारांच्या कुटुंबांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जो तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत होता. अनेकांचे फोन बंद आल्याने त्यांची भीती अधिकच वाढली. नेमकं काय घडलंय, हे कोणालाच कळत नव्हते; मात्र काहीतरी दुर्घटना झालीय, याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती.

या दुर्घटनेबाबत ओडिशातील काही कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्या कामगारांनी माहिती देण्यास नकार दिला. अखेरीस ज्या गावातील तरुणाचा मृत्यू झालाय, त्या गावात ओडिशामधून फोन आला आणि सारा प्रकार पुढे आला. ओडिशाला शिफ्ट झालेल्या त्या प्लांटमध्ये गॅस वाहून नेणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह अचानक फुटला आणि त्यात गुदमरून त्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, मोठा भाऊ असे कुटुंब आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBlastस्फोटDeathमृत्यू