काेकण रेल्वे मार्गावर उद्या चार तासांचा मेगाब्लाॅक

By मनोज मुळ्ये | Updated: June 13, 2023 21:14 IST2023-06-13T21:14:18+5:302023-06-13T21:14:38+5:30

रत्नागिरी : मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी चार तासांचा ...

A four-hour mega-block tomorrow on the Kokan railway line | काेकण रेल्वे मार्गावर उद्या चार तासांचा मेगाब्लाॅक

काेकण रेल्वे मार्गावर उद्या चार तासांचा मेगाब्लाॅक

रत्नागिरी : मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू होणार आहे. ताे दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे.

या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या मडगाव ते कुमठा सेक्शनमधून धावणारी ०६६०२ मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन विशेष गाडी कुमटा स्थानकापर्यंतच धावणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते मडगाव स्थानकादरम्यान ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव -मंगळुरु जंक्शन या गाडीचा प्रवास कुमट्यापासून सुरू होणार आहे.

Web Title: A four-hour mega-block tomorrow on the Kokan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.