शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील गोळीबार प्रकरणात उघडकीस आला वेगळाच प्रकार, पोलिस निरीक्षक भोयर यांनी दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:34 IST

खेड : दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची माहिती ११२ क्रमांकावर करून पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती खेडचे पाेलिस निरीक्षक नितीन ...

खेड : दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची माहिती ११२ क्रमांकावर करून पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती खेडचे पाेलिस निरीक्षक नितीन भाेयर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. याप्रकरणी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गाेळीबार झाला नसून हा बनाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शनिवारी, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेड पोलिसांना रेल्वे स्थानकानजीक खोपी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून गाडीची काच फोडल्याबाबत ११२ क्रमांकावर तक्रार आली होती. त्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या चौकशीतून या प्रकरणात वेगळाच प्रकार उघडकीस आला. अपघात लपवण्यासाठी फायरिंगचा बनाव केला गेल्याचे पाेलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी म्हटले आहे.तपासादरम्यान तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांचे जबाब परस्परविरोधी आढळले. तसेच कोणत्याही प्रत्यक्ष साक्षीदारांनी गोळीबार झाल्याचे पाहिले नसल्याचे सांगितले. घटनास्थळी गोळीबाराचे कोणतेही पुरावे जसे की काडतुसे किंवा बंदुकीचे अवशेषही आढळले नसल्याचे म्हटले आहे.

गाडीचा अपघातएका अनोळखी दुचाकीचा अपघात झाला हाेता. त्या अपघातानंतर वादावादी आणि दगडफेक झाली होती. या प्रकारानंतर तक्रारदार यांनी आपल्या भावाला खोटी माहिती देत फायरिंग झाल्याचा बनाव रचल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेडFiringगोळीबारPoliceपोलिस