शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचा झटका, चालत्या गाडीत देवरुख आगाराच्या वाहकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:07 IST

देवरुख : हृदयविकाराचा झटका आल्याने बसवाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी करजुवे देवरुख यादरम्यान घडली. तुकाराम कुंडलिक ...

देवरुख : हृदयविकाराचा झटका आल्याने बसवाहकाचा चालत्या बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी करजुवे देवरुख यादरम्यान घडली. तुकाराम कुंडलिक माने (४२) असे या वाहकाचे नाव असून, तो मूळचा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील आहे.मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी सकाळी ११:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत संगमेश्वर ते करजुवे अशा फेऱ्या मारल्या. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी ६:१५ वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे निघाली. थोड्याच अंतरावर भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले.चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम मानेकडे विचारपूस केली. त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले. चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले. मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती.देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच अनेक चालकवाहकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. काही वाहक आणि चालकांना अश्रू अनावर झाले. संगमेश्वरचे परिविक्षाधीन उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे, उपनिरीक्षक राजेश शेलार, उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हेडकॉन्स्टेबल बरगळे, कॉन्स्टेबल बाबुराव कोंदल यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.?

सात वर्षांपूर्वी रुजूबीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहककम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहतात. अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू