शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

रत्नागिरी जिल्ह्यात शोध मोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे ९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:24 IST

५७३ संशयित रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून, एकूण ३२,८५० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ५७३ संशयित सापडले असून, त्यापैकी ९ जणांना कुष्ठरोग झाल्याचे निदान झाले आहे.जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतील कामाचे पर्यवेक्षण करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी व पर्यवेक्षक तसेच प्रत्यक्ष रुग्णांचे सर्वेक्षण व तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेत उत्तम काम केले.

जिल्ह्यातील चिरेखाण कामगार, बागांमधील रखवालदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरित व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, तसेच कारागृहातील कैदी यासारख्या सर्व जोखीमग्रस्त भागात ही शोध मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेपुरते मर्यादित न राहता यापुढेही आरोग्य कर्मचारी आपल्या नियमित गृहभेटीत नागरिकांची तपासणी करणार आहेत. तसेच फिकट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखरे मज्जातंतू, हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्वरित संपर्क संपर्क साधावा. - डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्यdoctorडॉक्टर