८७ भारतीयांची सुटका
By Admin | Updated: March 7, 2016 23:14 IST2016-03-07T23:14:41+5:302016-03-07T23:14:41+5:30
पाकिस्तानने ८७ भारतीयांची सुटका करून सोमवारी वाघा सीमेवर त्यांना भारताच्या स्वाधीन केले. सुटका झालेल्यांपैकी बहुतांश मच्छीमार असून

८७ भारतीयांची सुटका
कुडाळ : सिंधुदुर्गनगरी येथे सुरू असलेले डंपर चालक-मालक संघटनेचे आंदोलन काँग्रेसच्यावतीने ९ मार्चपर्यंत सुरूच ठेवणार असून, न्याय न मिळाल्यास हे आंदोलन जिल्हाव्यापी केले जाईल. तसेच २१ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व प्रश्नांसंदर्भात काँग्रेसचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुडाळ येथील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. मार खाऊन पळून जाणाऱ्या शिवसेना, भाजपच्या नेत्यांची जनतेचे प्रश्न सोडविण्याची लायकी नाही. आगामी निवडणुकीत या सेना-भाजपवाल्यांना घरी पाठविल्याशिवाय राजकीय निवृत्तीचा निर्णय घेणार नाही, असेही राणे म्हणाले.
कुडाळ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी डंपर चालक-मालक संघटनेच्या आंदोलनाबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी विकास कुडाळकर, आनंद शिरवलकर, दिलीप रावराणे, संजू परब, सुनील भोगटे, रुपेश पावसकर, विशाल परब व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले की, जिल्हाधिकारी आपल्या दालनात कुलूप करून बसतात; मात्र लोकप्रतिनिधींना भेट देत नाही. उलट त्यांनी पोलिसांना अमानुष लाठीमार करायला लावला. यात सर्व पक्षीय कार्यकर्ते, व्यावसायिक रक्तबंबाळ व जायबंदी झाले. (प्रतिनिधी)
सेना-भाजपवाले
मुंबईला पळाले
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक व भाजपचे राजन तेली व इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पकडून बेदम मारले. हे नेते मार खाऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बदली करण्यासाठी मुंबईला पळाले. मात्र, दोन दिवस झाले तरी बदलीबाबत कोणताच निर्णय नाही, असा टोला राणे यांनी लगावत लाठीचा वळ येण्याअगोदरच बदली झाली पाहिजे होती. खासदार विनायक राऊत बेजबाबदारपणे बोलतात. त्यांनी कोकणाच्या व राज्याच्या प्रश्नांसंदर्भात लोकसभेत एकदा तरी बोलावे.
जिल्हाधिकाऱ्यांवर
हक्कभंग आणणार
आंदोलनकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना भेट न देणे, अमानुष लाठीमार करायला लावणे व जिल्हा शल्यचिकित्सकांना अपशब्द वापरणे याप्रकरणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे-पाटील व नीतेश राणे हक्कभंग आणतील, असेही ते म्हणाले. मी जे बोलतो ते करून दाखवतोच. इतरांचे बोलणे हवेत उडून जाते. या फसव्या युती सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. २२ मार्चपासून जिल्ह्यात सुरू होत असलेल्या दारू, जुगार, अनैतिक धंद्यांची पोलखोल करीत राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
तोपर्यंत राजकीय
निवृत्तीचा निर्णय नाही
माझ्या निवृत्तीबद्दल बोलणाऱ्या सेना-भाजपवाल्यांच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निवडणुकीत पराभूत करून घरी पाठविल्याशिवाय मी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेणार नाही, असा दृढ निश्चय केला असल्याचेही नारायण राणे म्हणाले. यापुढे पोलिसांकडून डंपर अडविले जाणार नाहीत याची हमी आयुक्तांनी दिल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याशी वाळू वाहतुकीच्या कमीतकमी दंड आकारणीची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी दंड आकारण्याच्या निर्णयात सुधारणा करून नवा निर्णय काढण्याचे आश्वासन दिल्याचे राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांवर
हक्कभंग आणणार
आंदोलनकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना भेट न देणे, अमानुष लाठीमार करायला लावणे व जिल्हा शल्यचिकित्सकांना अपशब्द वापरणे याप्रकरणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे-पाटील व नीतेश राणे हक्कभंग आणतील, असेही ते म्हणाले. मी जे बोलतो ते करून दाखवतोच. इतरांचे बोलणे हवेत उडून जाते. या फसव्या युती सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. २२ मार्चपासून जिल्ह्यात सुरू होत असलेल्या दारू, जुगार, अनैतिक धंद्यांची पोलखोल करीत राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.