७,७५३ लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यात अपात्र; सरकारचे एक कोटी १६ लाख २९,५०० रुपये वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:05 IST2025-04-29T09:05:01+5:302025-04-29T09:05:17+5:30
या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १८,७८५ लाडक्या बहिणींना १५०० रुपये लाभ देण्यात आला आहे. मात्र, या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याचे लक्षात आले.

७,७५३ लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यात अपात्र; सरकारचे एक कोटी १६ लाख २९,५०० रुपये वाचणार
रत्नागिरी :लाडकी बहीण योजना आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरत आहे. या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे. या छाननीमध्ये जिल्ह्यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारचे एक कोटी १६ लाख २९,५०० रुपये वाचणार आहेत.
या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १८,७८५ लाडक्या बहिणींना १५०० रुपये लाभ देण्यात आला आहे. मात्र, या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याचे लक्षात आले. अनेक योजनांना त्यामुळे कपातीचा फटका बसला.
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
अटींचे केले उल्लंघन
आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने शासनाने योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरू केली. याेजनेतील लाभार्थींसाठी अनेक अटी घालण्यात आल्या.
या अटींचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतलेल्या
७,७५३ लाडक्या बहिणी सापडल्या आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यात आले.