शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथे ७० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, तरुण ताब्यात; रत्नागिरी पाेलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:36 IST

शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याचा पाेलिसांनी व्यक्त केला संशय

रत्नागिरी : खेड-मंडणगड रस्त्यावर गस्तीदरम्यान एका तरुणाला जिवंत गावठी बाॅम्बसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने माैजे मुगीज (ता. खेड) येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलिस स्थानक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या आहेत. खेड-मंडणगड रस्त्यावर बुधवारी सायंकाळी गस्त घालताना प्रकाश जगताप याच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यामुळे त्याला पाेलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे ७० जिवंत गावठी बाॅम्ब सापडले. या बाॅम्बसह चारचाकी गाडी असा एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रकाश जगताप याला ताब्यात घेऊन दापोली पोलिस स्थानकात भारतीय स्फोटक कायदा १९०८ कलम ५ तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, सत्यजित दरेकर, चालक अतुल कांबळे यांनी केली.शिकारीसाठी वापर?पाेलिसांनी जप्त केलेले बाॅम्ब शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे बाॅम्ब संशयिताने स्वत: तयार केले आहेत की अन्य काेणाकडून घेतले आहेत, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलिस स्थानकात अथवा डायल ११२ या संपर्क क्रमांकावर कळवावी. - नितीन बगाटे, पाेलिस अधीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : 70 Live Bombs Seized in Khed, Youth Detained; Investigation On

Web Summary : Ratnagiri police seized 70 live bombs and detained a youth in Khed. The suspect, Prakash Jagtap, was found with the explosives during patrolling. Police suspect the bombs were for hunting and are investigating their origin. A case has been registered.