लांजात तीन दिवसांत ७ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST2021-03-31T04:32:57+5:302021-03-31T04:32:57+5:30

लांजा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांत सात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ...

7 new corona patients in three days | लांजात तीन दिवसांत ७ नवे कोरोना रुग्ण

लांजात तीन दिवसांत ७ नवे कोरोना रुग्ण

लांजा :

तालुक्यात गेल्या तीन दिवसांत सात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

रविवारी आडवली येथील २० वर्षीय तरुण, तसेच निवसर येथील ५८ वर्षीय प्रौढाची अँटिजन कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. व्हेळ मधलीवाडी येथील ५४ वर्षीय प्रौढ, लांजा बौद्धवाडी ४५ वर्षीय प्रौढ, कोर्ले पिम्पळवाडी ५० वर्षीय प्रौढ यांची अँटिजन कोरोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली आहे. जावडे ताटकेवाडी येथील ३२ वर्षीय तरुण, मठ बौद्धवाडी येथील ४२ वर्षीय प्रौढ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७० झाली असून, त्यापैकी २२८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत कोरोनाने १५ जणांचा बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात २७ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

Web Title: 7 new corona patients in three days