जिल्ह्यात कोरोनाबाधित ६५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:33+5:302021-09-17T04:38:33+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी हाेत असून, दिवसभरात केवळ ६५ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला ...

जिल्ह्यात कोरोनाबाधित ६५ नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी हाेत असून, दिवसभरात केवळ ६५ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर १३३ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १,२०२ बाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात २,४०१ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यात मंडणगड तालुक्यात दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दापोली तालुक्यात १० रुग्ण, खेड, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळुणात १४, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत २२, लांजा, राजापुरात प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण ७७,१७९ रुग्णसंख्या झाली आहे. जिल्ह्यात लक्षणे असलेले ३५९ रुग्ण असून लक्षणे नसलेले ५१७ रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात २, तर संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २,३७९ झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात ७३,५९८ कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३६ टक्के आहे.