जिल्ह्यात आढळले नवे ६२ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:04+5:302021-03-27T04:33:04+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह ६२ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,६१७ झाली आहे. ...

जिल्ह्यात आढळले नवे ६२ कोरोना रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह ६२ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,६१७ झाली आहे. १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची संख्या ९,९११ झाली आहे.
जिल्ह्यात ११७० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून ११०८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात १७ रुग्ण, तर सर्वात जास्त २५ रुग्ण चिपळूण तालुक्यात आढळले. दापोलीत ३ रुग्ण, खेडमध्ये ९ रुग्ण, गुहागरात १ रुग्ण, संगमेश्वरमध्ये ३ रुग्ण आणि मंडणगड, लांजात प्रत्येकी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. राजापूर तालुक्यात दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आलेला नाही.
कोरोनाचे १२३ रुग्ण गृहविलगीकरणात असून, २६२ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३७१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३.४९ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३५ टक्के आहे.