शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 15:13 IST

विकासकामांचा घेतला आढावा

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जसे मुंबई आणि ठाणे येथे रुग्णालये सुरू झाली आहेत त्याच धर्तीवर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये केवळ एका केसपेपरच्या आधारावर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ७७ कोटी रुपये मंजूर असलेल्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत इमारत पूर्ण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.नगर परिषदेची नूतन इमारत अंतिम टप्प्यात आहे, तर रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन इमारतीचे काम ९० टक्के झाले असून, लवकरच ही इमारत पूर्ण होईल. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे कामही येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. रहाटाघर बस स्थानकातील काँक्रिटीकरणासह इतर कामे १५ दिवसांत पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले.मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे ६० कोटींचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, ४१ कोटींच्या सुशोभीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत उद्घाटनासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपतींचा पुतळारत्नागिरी शहरातील शिवसृष्टीचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक नूतनीकरणाचा पहिला भाग पूर्ण झाला असून, तेथील उजव्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र आणि वाचनालय सुरू केले जाईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

अमिताभ बच्चन यांचा आवाजथ्रीडी मल्टिमीडियाचे काम पूर्णत्वास आले असून १५ ऑगस्टला त्याचे लोकार्पण होणार आहे. या थ्रीडी मल्टिमीडियामध्ये मराठीसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह हिंदी आणि इंग्रजी आवाजासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज असेल, असं त्यांनी सांगितले.

साईडपट्ट्यांचे काम लवकरचरत्नागिरी शहरातील काँक्रिटीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. हे काम पूर्णत्वास आले असून इतर रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. साईडपट्ट्यांचे रखडलेले कामही लवकरच पूर्ण होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलUday Samantउदय सामंत