शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 19:05 IST

स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध

शिवाजी गोरेदापोली : दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी सुमारे ५ कोटी ८१ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात दीपक दिलीप सावंत (४४, रा. काळकाई कोंड, दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नगर पंचायतीचे लेखापाल सिद्धेश विश्वनाथ खामकर यांनी फिर्याद दिली आहे. दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल सावंत यांनी आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ या कालावधीत हा अपहार केल्याचे कार्यालयीन चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी हा अपहार उघड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.सावंत २००३ पासून दापोली नगर पंचायतीमध्ये लेखापाल या पदावर रुजू होते. या कालावधीत त्यांनी दापोली नगर पंचायतीच्या विविध बँक खात्यांतील दोन कॅशबुक तयार केली होती. त्यांनी दिनांक १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत दापोली नगर पंचायतीच्या विविध खात्यांमध्ये शासनाकडून आलेल्या विविध निधीतून व दापोली नगर पंचायतीच्या स्वनिधी खात्यातून रक्कम वर्ग केली. स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक शशिकिरण काशीद यांच्या कार्यालयाकडेही बिनतारी फिर्याद देण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी