दापोली : तालुक्यातील केळशी येथे २० लिटर व दाभिळमध्ये २० लिटर अशी एकूण ४० लिटर गावठी दारू दापोली पोलिसांनी जप्त केली.
आडे दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल कमलाकर चौरे व कॉन्स्टेबल शिवहरी दळवी यांना या हातभट्टीच्या दारूबाबत माहिती मिळाली़ त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता केळशी वरचा डुंग येथे धाड टाकली. संशयित राजेंद्र धोपावकर (६५) हे गोठ्यात बसलेले आढळले. त्यांच्या ताब्यात १ हजार ५० रुपयांची २० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल कमलाकर चौरे करत आहेत तर दाभिळ तेलीवाडी येथे छापा मारून संशयित चंद्रशेखर जाधव (४८) यांच्या ताब्यात ७८० रुपयांची २० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळाली. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मंदार हळदे करत आहेत.