शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी विशेष मोहिमेत २ हजार ७०५ नवीन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:33 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २ हजार ...

ठळक मुद्देमतदार नोंदणी विशेष मोहिमेत २ हजार ७०५ नवीन अर्जप्रक्रिया ७ मार्चपर्यंत पूर्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २ हजार ७०५ नवीन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही, अशांना मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित केली होती. जिल्ह्यातील १ हजार ६९९ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहिले होते.गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात नव्याने ३४ हजारांहून अधिक तरुण मतदारांनी नावनोंदणी केली आहे, तर जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या संख्येत ६७ हजार ८९ने वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदारयादी दिनांक ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ रोजी एकूण मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ४८९ एवढी होती, तर मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात नव्याने मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ जानेवारी २०१९च्या अंतिम यादीनुसार एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, आता १२ लाख ९५ हजार ५७८ मतदार झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मतदारसंख्येत यावेळी ६७,०८९ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत दाखल झालेल्या अर्जांमध्ये १ हजार ६६३ जणांनी नाव नोंदणी केली आहे. ४०७ जणांनी नाव वगळण्यासाठी अर्ज दिले आहेत. ५८६ जणांनी दुरूस्तीसाठी, तर ४९ जणांनी भागातून नाव बदलण्यासाठी अर्ज केल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. या अर्जांची तपासणी करून यादीत नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ७ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी