शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात गॅस सिलिंडरमध्ये २४१ने वाढ; सबसिडीचा आधारही गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली. अर्थचक्र थांबले, उपासमारीची वेळ आली. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली. अर्थचक्र थांबले, उपासमारीची वेळ आली. मात्र, तरीही महागाईचा डोंब उसळलेला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या वर्षभरात दामदुप्प्ट झाले असून, कोरोनाचे संकट असतानाच, गेल्या वर्षभरात २४१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यातच ग्राहकांना दिलासा देणारी १५० ते २०० रुपयांची सबसिडीही गेल्या वर्षभरात गायब झाल्याने सामान्य माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न सतावू लागला आहे.

कोरोनामुळे बेकारीही वाढली आहे. हातातील पैसा गायब झाला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या वाढत्या दराने सामान्यांचे जगणे अवघड केले आहे.

शहरात चूलही पेटविता येत नाही

कोरोनामुळे पगार कपात झाल्याने आहे, त्याच खर्चात भागवावे लागत आहे. असे असताना आता घरगुती गॅसही महागला आहे. शहरात फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना आता चुलीचा आधारही घेता येत नाही. या महागाईने त्रस्त केले आहे.

- आशालता चन्ने, गृहिणी, रत्नागिरी

सरकारने सर्वच गोष्टींची महागाई वाढवली आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. कोरोनाने आर्थिक गणित कोलमडले असतानाच, आता घरगुती गॅसचे दरही भरमसाठ वाढू लागले आहेत. आता त्यावरील सबसिडीही बंद झाली आहे.

- क्षमा सावंत, गृहिणी, रत्नागिरी