शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

नोकरीचे आमिष; रत्नागिरी, सिंधुदुर्गात २२५ जणांना गंडा; संशयित कोल्हापूरचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:56 IST

डाटा ऑपरेटर व तालुका समन्वयकाची नोकरी देण्यात आमिष

कणकवली: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आरोग्य विषयक योजना गावागावात पोहचविण्यासाठी डाटा ऑपरेटर व तालुका समन्वयकाची नोकरी देण्यात येईल. असे आमिष दाखवून त्याच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर जिल्हयातील दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील २२५ हून अधिक युवक, युवतींकडून प्रत्येकी ५ हजार रुपये उकळून लाखो रुपयांचा गंडा घातला.कणकवलीतील नगरवाचनालयाच्या सभागृहामध्ये बुधवारी आणि गुरुवारी हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी जिल्हयाभरातील युवक आणि युवती आले होते. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आरोग्यविषयक माहिती गावागावत जावून पोहचवावी आणि आवश्यक डाटा गोळा करावा यासाठी डाटा ऑपरेटर तसेच तालुका स्तरावर समन्वयक अशी नोकरी दिली जाणार आहे. डाटा ऑपरेटरला १५ हजार तर समन्वयकाला २१ हजार रुपये पगार दिला जाईल. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल असे सांगत त्या मुलांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे पैसे घेण्यात आले.हा प्रकार संशयास्पद असल्याचे समजताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रशिक्षणस्थळी जाऊन संबंधित कथित अधिकाऱ्यांच्याकडे अधिकृत लेखी आदेश आहेत का? अशी विचारणा केली. मात्र त्यांच्याकडे तसे कोणतेही अधिकृत पत्र आढळले नाही. त्यामुळे हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असून पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली जाईल असे सांगत त्या दोन कथित अधिकार्‍यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. याच दोन कथित अधिकार्‍यांनी रत्नागिरीमध्येही १७० महिलांकडून अशाच प्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले आहे.हा प्रकार समजताच पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, महिला उपनिरीक्षक बरगे, हवालदार बावधाणे हेही त्याठिकाणी पोहचले. मुलांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनीही मुलांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा देताच त्या कथित अधिकार्‍यांनी ७५ मुलांचे प्रशिक्षणासाठी घेतलेले पैसे दोन दिवसात मागे देण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी त्या दोन कथित अधिकार्‍यांना पोलिस स्टेशनला नेवून त्यांची चौकशी सुरु केली. त्यांची सखोल चौकशी करुन यामध्ये ते दोषी आढल्यास पुढील कारवाई केली असे पोलिसांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अण्णा कोदे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.खेडमध्ये १६२ जणींची फसवणूकखेड तालुक्यातही अशाच प्रकारे जवळपास दीडशेहून अधिक महिलांकडून पैसे उकळण्यात आले, याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर येथील एका व्यक्तीने आपण महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टचा प्रमुख असल्याचे सांगत ग्रामपंचायतीमध्ये पंधरा हजार रुपये वेतन मिळवून देणारी डाटा ऑपरेटरची नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संबंधित महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये एका संस्थेच्या नावे उकळले.एका वृत्तपत्रात या नोकरीबाबत जाहिरात देऊन यासाठी संपर्क केलेल्या महिलांना मार्च महिन्यात डेटा ऑपरेटरच्या नोकरीसाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र बेरोजगार महिलांनी असमर्थता दर्शविल्याने त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेण्यात आले. या महिलांनी ही रक्कम संबंधित संस्थेला ऑनलाइन भरल्यावर त्यांना संबंधित संस्थेच्या लेटरहेडवर सही व शिक्का असलेले कोरे प्रमाणपत्र पाठवून दिले होते.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र यानंतर तीन महिने झाले पत्र दिले नाही. जिल्ह्यातील सुमारे १६२ बेरोजगार महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन नोकरी न देता फसवणूक केल्याचा उघडकीस आला आहे. याबाबत शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.या महिलांनी मार्च महिन्यात ऑनलाइन पैसे देऊनही प्रत्येक वेळी पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात नोकरीसाठी नियुक्तिपत्र दिले जाईल, असे आश्वासन देण्यात येत होते. याविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देतानाचा जुना फोटो पाठवून त्यामध्ये आपल्या संस्थेला जिल्हाधिकारी यांनी वर्कऑर्डर दिल्याचे संबंधित व्यक्तीकडून भासवले जात होते. याची माहितीही पोलिसांना दिली जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी