शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे ट्रॅव्हल्स-डंपरचा अपघात, २१ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:25 IST

१२ किलोमीटरपर्यंत महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा

आरवली : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजता ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.कडवई येथे रस्त्याचे काम करणाऱ्या ए. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीचा डंपर चालक चालू गाडी सोडून पळून गेला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक रखडली. दोन्ही बाजूला अकरा ते बारा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर रात्री नऊ वाजता ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिकांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत केली.कोपरखैरणे येथून गणपतीपुळे येथे आलेले भक्तगण खासगी आरामबसने (एमएच ४३ सीई ४२९३) परतीच्या मार्गावर होते. तुरळ फाटा येथे त्या बसच्या पुढे असलेल्या डंपरचालकाने (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) उजव्या बाजूला वळताना इंडिकेटर दाखवला नाही. अचानक गाडी उजव्या बाजूला वळवल्याने आरामबस डंपरच्या मागे जाऊन जोरात धडकली. बसच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचालकासह २१ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

महामार्गावरून कडवई येथे जाण्यासाठी असलेल्या डायव्हर्शननजीक हा अपघात झाला. त्यामुळे दोन्ही बाजूला सुमारे दहा ते बारा किलामीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. खराब डायव्हर्शनमुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष थेराडे यांनी याची माहिती महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी हजर न राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.अखेर ग्रामस्थ आणि रिक्षा संघटनेच्या मदतीने सहायक पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली चार तासांच्या अथक प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी जितेंद्र चव्हाण, विजय कुवळेकर, राजेंद्र सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हरेकर, अरविंद जाधव उपस्थित होते. रात्री २ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात