शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी मंजूर, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:27 IST

आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले

रत्नागिरी : स्टरलाइट कंपनीसाठीची जागा एमआयडीसीला परत मिळाल्यामुळे रत्नागिरी मोठी औद्योगिक वसाहत झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.ज्या ठिकाणी मोठ्या क्षेत्रात औद्योगिक वसाहत असेल ते शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याची एमआयडीसीची योजना आहे. जशी पुण्यातील तळोजा ही स्मार्ट सिटी बनवण्यात आली आहे, त्याचपद्धतीने रत्नागिरीलाही स्मार्ट सिटी बनवले जाईल, असे मंत्री सामंत म्हणाले. स्टरलाइट कंपनीची साडेसातशे हेक्टर जागा एमआयडीसीकडे परत आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीची एमआयडीसी कोकणातील सर्वांत मोठी एमआयडीसी झाली आहे. त्यामुळेच येथे स्मार्ट सिटी योजना राबवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यासाठी एमआयडीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आपण २०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही ते म्हणाले.

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालय, नगर परिषद, १०० काेटींचे जिल्हा प्रशासनाचे कार्यालय, जिल्हा परिषद, एस. टी.चे विभागीय कार्यालय, एमआयडीसीतील विश्रामगृह या आधुनिक इमारती हा स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा आहे. ही कामे शासकीय निधीतून झाली आहेत. आता पुढच्या टप्प्यात या २०० कोटी रुपयांमधून कोणती कामे करता येतील, याचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटन विकासाची कामे, शहरातील छोटे रस्ते, गटारे यासारखी कामे यातून करता येऊ शकतील. त्यासाठीच आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguardian ministerपालक मंत्री