करमणूक करापोटी प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख
By Admin | Updated: November 10, 2014 23:55 IST2014-11-10T23:16:55+5:302014-11-10T23:55:05+5:30
लांजा अव्वल : जिल्ह्यात रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालय अव्वल

करमणूक करापोटी प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेला ३ कोटी ९५ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ३ कोटी ९५ लाख इतक्या उद्दिष्टापैकी २ कोटी १५ लाख ९४ हजार रूपयांच्या महसूलची (५४.६६ टक्के) भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक महसूल रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने (३० लाख ९१ हजार, ५०.५१ टक्के) इतका मिळविला आहे, तर सर्व तालुक्यात लांजा अव्वल (१ लाख १८ हजार, ६९.४१ टक्के) आहे.
जिल्हा करमणूक कर शाखेला २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता ३ कोटी ९५ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्यासह तीन उपविभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे. उपविभाग दापोलीत मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभाग चिपळूणमध्ये चिपळूण, गुहागर, देवरूख (संगमेश्वर) या तीन तालुक्यांचा, तर रत्नागिरी उपविभागात रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे.
यावर्षी संपूर्ण जिल्ह्याला ३ कोटी ९५ लाख रूपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर २ कोटी १५ लाख ९४ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात रत्नागिरी उपविभाग पहिला आणि दापोली, चिपळूण अनुक्रमे द्वितीय व तृतीय आहेत. जिल्ह्यात लांजा तालुका प्रथम असून, त्यापाठोपाठ संगमेश्वर आणि गुहागर अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. एप्रिलमध्ये लोकसभा आणि त्यापाठोपाठ चारच महिन्यांनी विधानसभा निवडणूक आल्याने वसुली गतवर्षी पेक्षा कमी झाली आहे.
सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ४७ लाख ४४ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ४८ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्च २०१५ पर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास या शाखेकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारी
रत्नागिरी५४.३०२७.४१५०.४८
लांजा१.७०१.१८६९.३९
राजापूर५.२०२.३२४४.६२
रत्नागिरी उपविभाग६१.२०३०.९१५०.५१
एकूण१४७ ६८.५०४६.६०
डी. टी. एच२४८१४७.४४५९.४५
एकूण३९५२१५.९४५४.६६
तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारी
मंडणगड१.७५०.३७२१.१४
दापोली६ २.६८४४.६७
खेड२०९.३५४६.७५
दापोली उपविभाग२७.७५१२.४०४४.६८
चिपळूण४५१७.८५३९.६७
गुहागर८४.४९५४.८८
संगमेश्वर५.०५२.९५३९.६७
चिपळूण उपविभाग५८.०५२५.१९४३.३९
ंगतवर्षी उद्दिष्टापेक्षा २७ टक्के अधिक वसुली मार्च अखेर झाली होती. मात्र, आता आॅक्टोबरपर्यंत काही तालुक्यांची वसुली ५० टक्केही झाली नाही. कारण एप्रिल आणि आॅक्टोबरमध्ये निवडणुका आल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. मात्र, यावर्षीही मार्चअखेर जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती नक्कीच होईल.
- रवींद्र खानविलकर,
सहायक करमणूक कर अधिकारी