पोसरे दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:22+5:302021-07-26T04:29:22+5:30

खेड : तालुक्यातील पोसरे - बौद्धवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाल्याचे रविवारी ...

16 killed, 1 missing in Posare Darad accident | पोसरे दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता

पोसरे दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता

Next

खेड : तालुक्यातील पोसरे - बौद्धवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाल्याचे रविवारी (२५ जुलै) स्पष्ट झाले आहे तर अद्यापही एकजण बेपत्ता आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सातजणांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

तालुक्यातील पोसरे - बौद्धवाडी येथे गुरुवार, दिनांक २२ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सात घरांवर डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत सातजणांना दगड मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तसेच बेपत्ता असलेल्या १७ व्यक्तींचा शोध शुक्रवारपासून सुरू होता. सुरुवातीला स्थानिकांना तीन ग्रामस्थ सापडले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखालून कुणी जिवंत सापडू शकते का, याचा शोध घटनास्थळी दाखल झालेले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घेत होते. मात्र, रविवार, दिनांक २५ पर्यंत बेपत्ता चौदा जणांपैकी बाराजणांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सोळाजणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Web Title: 16 killed, 1 missing in Posare Darad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.