शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:47 PM

लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम नवमतदारांमध्ये जाणीव जागृतीसुजाण भावी मतदार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोहीम

शोभना कांबळेरत्नागिरी : लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.अजूनही नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे लोकशाही प्रणाली यशस्वीपणे राबवताना अनेक अडचणी येत आहेत. अजूनही मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग १०० टक्के नाही. त्यामुळे पात्र उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे सर्वच निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये त्याचबरोबर नवमतदारांमध्ये जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निवडणूक साक्षरता क्लब तयार करण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८पासून सुरू झाली आहे.विद्यार्थीदशेत या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक कार्यपद्धती याबाबत जागृती होत राहिल्याने हे विद्यार्थी १८ वर्षांचे झाल्यानंतर ते आपोआपच सुजाण नागरिक होणार आहेत. यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक साक्षरता क्लब शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू रहाणार आहे. याकरिता दिल्ली येथील निवडणूक कार्यालयाकडून कार्यालयीन निधी तसेच याबाबतचे साहित्य जिल्हास्तरावर लवकरच उपलब्ध होणार आहे.

तसेच येथील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून ते कर्मचारी इथ आल्यानंतर प्रशिक्षण घेणार आहेत. हे साक्षरता क्लब लोकशाही प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणार असून लोकशाही कशी बळकट होणे आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेले निवडणूक साक्षरता क्लबशाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तर : १८७नव मतदार (वरिष्ठ महाविद्यालय स्तर) : ६५मतदान केंद्र स्तरावर : १२०२तसेच मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये ८३ क्लब स्थापन करण्यात आले असून, ही प्रक्रिया यापुढेही विविध शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांमध्ये सुरू रहाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक